हनुमान चालीसा |Hanuman Chalisa in Marathi
Lyrics of Hanuman Chalisa
दोहा
श्री गुरु चरण सरोज रज निजमन मुकुर सुधारि ।
वरणौ रघुवर विमलयश जो दायक फलचारि ॥
बुद्धिहीन तनुजानिकै सुमिरौ पवन कुमार ।
बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार ॥
चौपाई
जय हनुमान ज्ञान गुण सागर ।
जय कपीश तिहु लोक उजागर ॥ १ ॥
रामदूत अतुलित बलधामा ।
अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥ २ ॥
महावीर विक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी ॥३ ॥
कंचन वरण विराज सुवेशा ।
कानन कुंडल कुंचित केशा ॥ ४ ॥
हाथवज्र औ ध्वजा विराजै ।
कांथे मूंज जनेवू साजै ॥ ५॥
शंकर सुवन केसरी नंदन ।
तेज प्रताप महाजग वंदन ॥ ६ ॥
विद्यावान गुणी अति चातुर ।
राम काज करिवे को आतुर ॥ ७ ॥
प्रभु चरित्र सुनिवे को रसिया ।
रामलखन सीता मन बसिया ॥८॥
सूक्ष्म रूपधरि सियहि दिखावा ।
विकट रूपधरि लंक जलावा ॥ ९ ॥
भीम रूपधरि असुर संहारे ।
रामचंद्र के काज संवारे ॥ १० ॥
लाय संजीवन लखन जियाये ।
श्री रघुवीर हरषि उरलाये ॥ ११ ॥
रघुपति कीन्ही बहुत बडायी ।
तुम मम प्रिय भरत सम भायी ॥ १२ ॥
सहस्र वदन तुम्हरो यशगावै ।
अस कहि श्रीपति कंठ लगावै ॥ १३ ॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीशा ।
नारद शारद सहित अहीशा ॥ १४ ॥
यम कुबेर दिगपाल जहां ते ।
कवि कोविद कहि सके कहां ते ॥ १५ ॥
तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा ।
राम मिलाय राजपद दीन्हा ॥ १६ ॥
तुम्हरो मंत्र विभीषण माना ।
लंकेश्वर भये सब जग जाना ॥ १७ ॥
युग सहस्र योजन पर भानू ।
लील्यो ताहि मधुर फल जानू ॥ १८ ॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माही ।
जलधि लांघि गये अचरज नाही ॥ १९ ॥
दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥ २० ॥
राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ॥ २१ ॥
सब सुख लहै तुम्हारी शरणा ।
तुम रक्षक काहू को डर ना ॥ २२ ॥
आपन तेज सम्हारो आपै ।
तीनों लोक हांक ते कांपै ॥ २३ ॥
भूत पिशाच निकट नहि आवै ।
महवीर जब नाम सुनावै ॥ २४ ॥
नासै रोग हरै सब पीरा ।
जपत निरंतर हनुमत वीरा ॥ २५ ॥
संकट से हनुमान छुडावै ।
मन क्रम वचन ध्यान जो लावै ॥ २६ ॥
सब पर राम तपस्वी राजा ।
तिनके काज सकल तुम साजा ॥ २७ ॥
और मनोरध जो कोयि लावै ।
तासु अमित जीवन फल पावै ॥ २८ ॥
चारो युग प्रताप तुम्हारा ।
है प्रसिद्ध जगत उजियारा ॥ २९ ॥
साधु संत के तुम रखवारे ।
असुर निकंदन राम दुलारे ॥ ३० ॥
अष्ठसिद्धि नव निधि के दाता ।
अस वर दीन्ह जानकी माता ॥ ३१ ॥
राम रसायन तुम्हारे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ॥ ३२ ॥
तुम्हरे भजन रामको पावै ।
जन्म जन्म के दुख बिसरावै ॥ ३३ ॥
अंत काल रघुपति पुरजायी ।
जहां जन्म हरिभक्त कहायी ॥ ३४ ॥
और देवता चित्त न धरयी ।
हनुमत सेयि सर्व सुख करयी ॥ ३५ ॥
संकट क(ह)टै मिटै सब पीरा ।
जो सुमिरै हनुमत बल वीरा ॥ ३६ ॥
जै जै जै हनुमान गोसायी ।
कृपा करहु गुरुदेव की नायी ॥ ३७ ॥
जो शत वार पाठ कर कोयी ।
छूटहि बंदि महा सुख होयी ॥ ३८ ॥
जो यह पडै हनुमान चालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीशा ॥ ३९ ॥
तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय मह डेरा ॥ ४० ॥
दोहा
पवन तनय संकट हरण – मंगल मूरति रूप् ।
राम लखन सीता सहित – हृदय बसहु सुरभूप् ॥
सियावर रामचंद्रकी जय । पवनसुत हनुमानकी जय । बोलो भायी सब संतनकी जय ।
ध्यानम्
गोष्पदीकृत वाराशिं मशकीकृत राक्षसम् ।
रामायण महामाला रत्नं वंदे-(अ)निलात्मजम् ॥
यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकांजलिम् ।
भाष्पवारि परिपूर्ण लोचनं मारुतिं नमत राक्षसांतकम् ॥
हनुमान चालीसा ऐका
हनुमान चलिसेचा सम्पूर्ण अर्थ | Meaning of Hanuman Chalisa in Marathi
- पवित्र गुरुंच्या कमळाच्या चरणांच्या परागकण धुळीने माझ्या मनाचा आरसा स्वच्छ केल्यानंतर. मी श्री रघुवरांच्या शुद्ध, अविच्छिन्न महिमाचा प्रतिपादन करतो जे जीवनाचे चतुर्विध फळ देतात. (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष).
- माझ्या बुद्धिमत्तेच्या कमतरतेची पूर्ण जाणीव असल्याने, मी माझे लक्ष पवन कुमारवर केंद्रित करतो आणि नम्रपणे मला सर्व दोषांपासून मुक्त करण्यासाठी शक्ती, बुद्धिमत्ता आणि खरे ज्ञान मागतो.
- श्री हनुमानजी तुमचा जयजयकार असो. आपण गुण आणि ज्ञानाचे सागर आहात. हे कपिश्र्वर, आपला जयजयकार असो, तिन्ही लोक ( स्वर्ग, पाताल, धरती )मधे आपली किर्ती प्रख्यात आहे.
- हे पवनपुत्र अंजनी नंदन, तुझ्याइतका बलवान कोणी नाही.
- हे महावीर विक्रम बजरंगबली, तू विशेष पराक्रमी आहेस. तू दृष्टांतांचा नाश करतोस आणि चांगला विचार करणारांसोबत तू नेहमी असतोस
- आपण सोनेरी रंग, सुंदर वस्त्र, कानात कुंडल, आणि कुरळ्या केसांनी सुशोभित आहात
- आपल्या हातात वज्र आणि ध्वज आहे. खांद्यावर मुंज जनऊ ची शोभा आहे.
- हे भगवान शंकराचे अवतार , हे केशरी नंदन अपल्या पराक्रम आणि यशाचे गुणगान संपूर्ण विश्व करत आहे
- आपण प्रचंड विद्यावन, गुणवान, अत्यंत कार्य कुशल असुन प्रभु श्रीरामाचे कार्य करण्यास आतुर असतात
- आपल्याला श्री रामाचे चरित्र ऐकण्यास आनंद प्राप्त होतो. श्री राम, सीता आणि लक्ष्मण तुमच्या हृदयात सहवास करतात.
- आपण अती क्षुष्म रुप सीता मातेला दाखवले, तर भयंकर रुप धारण करुन लंकेचे दहन केले
- आपण भिमकाय रुप धारण करून राक्षसांचा नाश केला. आणि श्री रामाचे उद्दिष्ट यशस्वी केले.
- तुम्ही संजीवनी बुटी आणून लक्ष्मनाला जीवनदान दिले. त्यामुळे प्रभु श्रीरामानी आनंदित होऊन तुम्हाला आलिंगन दिले.
- श्री रामचंद्र यांनी तुमची खूप प्रशंसा केली आणि म्हणाले की तुम्ही भरत सार सारखे माझे प्रिय भाऊ आहात
- श्री राम आलिंगन देतात आणि म्हणतात की तुझे यश हजार मुखांनी उल्लेखनीय आहे
- श्री सनक, श्री सनंदन, श्री सनतकुमार, श्री सनातन,मुनी ब्रम्हा, नारद मुनी, शेषनाग , सरस्वती जी सर्व तुमचे गुण गातात
- यमराज, कुबेर इ. सर्व दिशांचे रक्षक, कवी विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या कीर्तीचे पूर्ण वर्णन करू शकत नाही.
- तुम्ही सुग्रीव आणि श्री राम यांची भेट करुन सुग्रीव जिन वर उपकार केले. सुग्रीवला राजपद मिळवून दिले.
- बिभीषण ज्यानी आपल्या उपदेशाचे पालन केले. त्यामुळे ते लंकेचे राजा बनले.हे सर्व जगाला माहित आहे.
- जो सुर्य इतक्या योजन लांब आहे, की त्याच्याजवळ पोहचायला हजारो युग लागतील. दोन हजार योजन लाबिवर असलेल्या सूर्याला तूम्ही एक गोड फळ समजून गिळून घेतल
- तुम्ही श्री रामाची अंगठी तोंडात धरून संपूर्ण समुद्र पार केला, यात काहीही आश्चर्य नाहि
- या जगात जितके काठीनाहून कठीण काम आहे,ते तुमच्या कृपेने सहज होतात
- तुम्ही श्री रामचंद्रजींच्या दरवाज्याचे रक्षक आहात, ज्यामध्ये तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नाही, म्हणजेच राम कृपा तुमच्या आनंदाशिवाय दुर्मिळ आहे. तुमच्या प्रशांशेशिवाय श्री राम कृपा दुर्लभ आहे.
- जो तुम्हाला शरण येतो, त्या सर्वांना आनंद प्राप्त होतो. तूम्ही रक्षक असताना कुठल्याच प्रकारचे भय राहत नाही.
- तुमच्याशिवाय, तुमचा वेग कोणीही रोखू शकत नाही.तुमच्या गर्जनाने तिन्ही लोकात थरकाप होतो
- जेथे महावीर हनुमान यांचे नाव उच्चारले जाते, तेथे भूत पिशाच जवळपासही भटकत नाही
- वीर हनुमान तुमचे निरंतर जप केल्याने सर्व रोग निघून जातात आणि सर्व त्रास नष्ट होतात
- हे हनुमान विचारात, कृती करण्यात, बोलण्यात ज्यांचे लक्ष नेहमी तुमच्यात असते, त्यांना सर्व संकटापासून तुम्ही सोडवतात
- तपस्वी राजा श्री राम सर्वात श्रेष्ठ आहेत, तूम्ही त्यांची सर्व कामे सहज केले
- ज्याच्यावर तुमची कृपा आहे, त्यानें कुठलीही इच्छा व्यक्त केली तर त्याला असे फळ मिळते की त्याची आयुष्यात काही सीमा नाही
- आपली किर्ती चारही युगात, सत्युग, त्रेतायुग, द्वापार, कली युगात, पसरली आहे. आपली किर्ती जगात सर्वत्र प्रकाशित आहे.
- हे श्री रामाचे प्रिय, तुम्ही सज्जनांचे रक्षण करता आणि दुष्टांच्या नाश करतात
- तुम्हाला श्री जानकी माते कडून अस वरदान भेटला आहे, ज्याद्वारे तूम्ही कोणालाही आठ सिद्दी आणि नऊ निधी देऊ शकता
- तुम्ही निरंतर रघुनाथांच्या आश्रयमध्ये राहतात. तुम्हाला म्हातारपण आणि असाध्य रोगाचे निर्मूलन करण्यासाठी राम नामाचे औषधी आहे
- तुमची पूजा केल्याने श्री रामांची प्राप्ती होते. जन्म- जन्मांतराचे दुःख दूर होते.
- अंत काळी श्री रघुनाथ धामाला जातात.आणि जर पुन्हा जन्म घेतला तरी पण भक्ती करतील, रामभक्त म्हणुन ओळखले जातील
- हे हनुमान, तुमची सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळतात. मग दुसऱ्या कुठल्या देवतांची सेवा करण्याची आवश्यकता नाही
- हे वीर हनुमान,जो तुमचे एकत राहतो,त्याची सर्व संकट दूर होतात.सर्व त्रास नाहीसे होतात
- हे हनुमान स्वामी, तुमचा जयजयकार असो. जय हो, जय हो, कृपाळू होऊन माझ्यावर कृपा करा.
- जो कोणी या हनुमान चालीसा चे शंभर वेळा पठण करेल,तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि त्याला परम आनंदाची प्राप्ती होईल
- भगवान शंकर साक्षी आहे की जो कोणी याचे वाचन करेल त्याला नक्की यश भेटेल
- हे नाथ, हनुमान जी, तुलसीदास सदैव श्री रामाचा सेवक आहे. म्हणून तुम्ही त्याच्य हृदयात निवास करा.